ऑनलाईन टीम / गाजियाबाद :
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनी यशस्वीरित्या कोरोनावर मात केली आहे. त्यांना आज दुपारी साधारण दोन वाजण्याच्या सुमारास कौशांबी येथील यशोधा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, वरिष्ठ डॉक्टरांनी सर्व टेस्टचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर कल्याण सिंह यांना रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी दिली. डॉक्टरांनी कल्याण सिंह घरी जात असताना त्यांच्यावर गुलाबाची फुले उधळली यासोबतच रुग्णालयाकडून एक तलवार देखील भेट म्हणून त्यांना देण्यात आली.
दरम्यान, कल्याण सिंह यांना सप्टेंबर महिन्यात ताप आला होता. त्यानंतर त्यांची कोरोना टेस्ट केली असता त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यानंतर 16 सप्टेंबर रोजी त्यांना कौशांबी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती आता पूर्णतः सुधारली आहे, आज त्यांनी यशस्वीरित्या कोरोनावर मात केली असून त्यांना आज घरी सोडण्यात आले आहे.