ऑनलाईन टीम / मथुरा :
श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाळ दास यांची तब्येत गुरुवारी सकाळी अचानक बिघडली असल्याची माहिती समोर येत आहे. ही माहिती समोर येताच मथुरेचे डीएम सर्वज्ञराम मिश्रा यांच्यासह सर्व अधिकारी आणि कोविड 19 ची टीम सीताराम आश्रममध्ये पोहचली आहे. त्यानंतर त्यांची कोरोना टेस्ट केली असता त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असल्याचे निष्पन्न झाले.
नृत्य गोपाळ दास यांना त्यांना काल थोडा ताप आला होता. मिळालेल्या माहितनुसार, नृत्य गोपाळ दास हे काल रात्री जन्माष्टमीच्या पूजेत देखील सहभागी झाले होते.
दरम्यान, महंत नृत्य गोपाळ दास हे 5 ऑगस्ट रोजी झालेल्या राम जन्मभूमी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह उपस्थित होते. त्यानंतर आज जवळपास दिवसांनी त्यांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे.