ऑनलाईन टीम / मुंबई :
एकीकडे कोरोना संकटाचा सामना करावा लागत असतानाच आता महाराष्ट्रतील उत्तर मुंबईत भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर मुंबई पासून 98 किलोमीटर वर भूकंपाचे केंद्र आहे. शनिवारी सकाळी 6.30 वाजता जाणवलेल्या या भूकंपाची तीव्रता 2.7 रिश्टल स्केल एवढी होती. या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही आहे.
यापूर्वी शुक्रवारी रात्री उशिरा म्हणजेच 11 वाजून 41 मिनिटांनी नाशिकमध्ये देखील भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले होते. भूकंपाची तीव्रता 4.0 रिश्टल स्केल एवढी होती.