वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नाडातर्फे घेण्यात आलेल्या उत्तेजक चाचणीत भारताची 23 वर्षाखालील वयोगटातील वेगवान महिला धावपटू दिल्लीची तरणजीत कौर दोषी आढळली आहे.
2021 सालाच्या ऍथलेटिक्स हंगामात दिल्लीची 20 वर्षीय तरणजीत कौर ही सर्वोत्तम महिला धावपटू ठरली आहे. दिल्लीत 27 ते 29 सप्टेंबर दरम्यान झालेल्या 23 वर्षांखालील वयोगटाच्या राष्ट्रीय ऍथलेटिक्स स्पर्धेत तरणजीत कौरने 100 मी. व 200 मी. धावण्यांच्या शर्यतीत सुवर्णपदके मिळविली आहेत. त्याचप्रमाणे राष्ट्रीय खुल्या ऍथलेटिक्स स्पर्धेत कौरने 100 मी. धावण्यांच्या शर्यतीत 11.50 सेकंदाचा अवधी घेत सुवर्णपदकासह सर्वांत जलद वेळ नोंदविली. उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याने तरणजीत कौरला आता पुढील निर्णयापर्यंत विविध स्पर्धांमध्ये सहभागी होता येणार नाही.