प्रतिनिधी/ पणजी
माजी मुख्य़मंत्री मनोहर पर्रीकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर यांनी कोरोनामुक्त झाल्यानंतर काल इस्पितळात जाऊन प्लाझ्मा दान केले.
या प्रतिनिधीशी बोलताना उत्पल म्हणाले की, कोरोना मुक्त झालेल्या सर्वांनीच प्लाझ्मा दान करावे. जेणेकरुन कोरोनामुळे अत्यंत गंभीर असलेल्या रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी ते फारच उपयोगी पडेल. प्रत्येक कोरोनामुक्त झालेल्याने जर प्लाझ्मा दान करण्याचा संकल्प सोडला तर अनेकांचे प्राण वाचतील. आपणही प्लाझ्मा दान केले. तुम्हीही दान करा. गोवा कोरोनामुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सरकारने बरीच पावले उचलेली आहेत परंतु सरकार बरोबरच प्रत्येक नागरिकाने देखील कोरोनामुक्तीसाठी पावले उचलणे आवश्यक असल्याचे उत्पल पर्रीकर म्हणाले.