जिल्हय़ात पोलिसांचे 16 छापे : देशी दारुसह ताडीही जप्त
प्रतिनिधी / सातारा
जिल्हय़ातील बेकायदा मटका, अवैध दारु विक्रीवर पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनी करडी नजर वळवली आहे. ते आल्यापासून जिल्हय़ात पोलिसांनी अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याचा धडाका सुरुच ठेवला असून बुधवारी देखील सातारा जिह्यात पोलिसांनी ठिकाणी दारू अड्डय़ांवर छापे टाकून 14 हजार 87 रुपयांची देशी दारु हस्तगत केला. त्यामध्ये ताडीचा ही समावेश आहे. याप्रकरणी 16 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, ज्यांच्यावर ही खरी जबाबदारी आहे तो उत्पादन शुल्क विभाग झोपला आहे की झोपेचे सोंग घेऊन पडला आहे, याची चौकशी कोण करणार ? असा सवाल निर्माण झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जिल्हय़ातील विविध तालुक्यात विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये बेलवडे (ता.कराड) गावच्या हद्दीत तेथीलच विजय हरिबा जाधव यांच्याकडून 624 रुपयाच्या देशी दारूच्या बाटल्या, पुसेसावळी (ता.खटाव) येथील हिंदुस्तान हॉटेलच्या समोरून शिवाजी बाळू जाधव (रा. पळशी, ता. खटाव) यांच्याकडून 2496 रुपयांच्या देशी दारूच्या बाटल्या, आसू (ता. फलटण) गावच्या हद्दीत गुरुदत्त शरणाप्पा सुटले यांच्याकडून 400 रुपये किंमतीची दहा लिटर ताडी जप्त करण्यात आली आहे.
तर किन्हई, (ता.कोरेगाव) येथे बस स्थानकाच्या बाजूला आडोशाला सिद्धनाथ सर्जेराव चव्हाण (रा. अंबवडे संमत, ता. कोरेगाव) यांच्याकडून 624 रुपयांच्या देशी दारूची वाटल्या, ओझर्डे, (ता.वाई) गावच्या हद्दीत शंकर राजेंद्र जाधव याच्याकडून 780 रुपये किंमतीची देशी दारूच्या बाटल्या, मणेरी, (ता. पाटण) गावच्या हद्दीत लक्ष्मण भागोजी सावंत यांच्याकडून 884 रुपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या, आसनगाव (ता.कोरेगाव) गावच्या हद्दीत तेथीलच बाळकृष्ण शंकर जाधव यांच्याकडून 936 रुपयांच्या देशी दारूच्या बाटल्या, पाडेगाव (ता. फलटण) गावच्या हद्दीत तेथीलच सायबू दगडू येळे यांच्याकडून 885 रुपयांच्या देशी दारूच्या बाटल्या, कोळकी (ता.फलटण) गावच्या हद्दीतून विजय गुलाब मोरे आणि उपका महादेव काशीद यांच्याकडून 2162 रुपयांच्या देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.
पाडळी (ता.कराड) गावच्या हद्दीतून शब्बीर अल्लादिन मकानदार यांच्याकडून 624 रुपये किंमतीच्या देशी दारूच्या बाटल्या, कालवडे, (ता.कराड) गावच्या हद्दीत महादेव मोरे यांच्याकडून 936 रुपये देशी दारूच्या बाटल्या, कोळे, (ता. कराड) गावच्या हद्दीत मयुर तुळशीदास कांबळे यांच्याकडून 780 रुपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या, ललगुण (ता. खटाव) गावच्या हद्दीत शिल्पा टिचर काळे हिच्याकडून 988 रुपये किंमतीच्या देशी, नरवणे (ता. माण) गावच्या हद्दीतून महादेव रामचंद्र जाधव यांच्याकडून 980 रुपये किंमतीची देशी दारूच्या बाटल्या असा एकण 14 हजार 87 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
शंभुराजेंकडून पोलिसांना दंड, उत्पादनला शाब्बासकी (शंभुराजेंचा फोटो वापरणे)
उत्पादन शुल्क विभागाचे राज्यमंत्री शंभुराजे हे जिल्हय़ाचे सुपुत्र आहेत. त्यांच्याकडून पोलीस दल सातत्याने धारेवर धरले जाते पण उत्पादन शुल्क विभागाला शाब्बसकीचे धोरण असल्याचे आश्चर्य वाटत राहते. वास्तविक, पोलीस दलाकडून सातत्याने कारवाया सुरु आहेत. वास्तविक अवैध दारु विक्रीवर रोख लावण्याची जबाबदार राज्य उत्पादनच्या अधिकाऱयांची देखील आहे. मात्र, त्यांच्याकडून मात्र कारवाई होताना दिसत नाहीत. त्यांना फक्त परमीटरुम, बिअरबार, बिअर विक्री दुकांनावर चकरा मारण्याचे काम देण्यात आले आहे की काय असा सवाल जनतेतून विचारला जात आहे.