प्रतिनिधी/ सातारा
नगरपरिषदेच्या पदाधिकाऱयांसह, विभाग प्रमुख असलेल्या अधिकाऱया समवेत झालेल्या बैठकीत आज सातारचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नगरपरिषदेच्या विविध कामांच्या सदयस्थितीचा आढावा घेतला.अधिकाऱयांनी जनसामान्यांना केंद्रबिंदू मानून काम करावे, गेल्या तीन-चार महिन्यांपासून कोरोनाशी लढा देत असताना, विकास कामांच्या पाठपुराव्यास जरी मर्यादा आल्या असल्या तरी सुध्दा येणाऱया काळात समयबध्द नियोजन करावे. लोकहिताची कामे मार्गी लागण्याबाबत, सर्व अधिकाऱयांनी आपापली जबाबदारी पार पाडावी, असा मार्गदर्शनात्मक सल्ला यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिला.
तसेच यावेळी महत्वाच्या विकास कामांची प्रत्यक्ष पहाणी केली. संबंधीतांबरोबर युनियन क्लब, यादोगोपाळपेठ बगिचा, जुन्या नगरपालिकेच्या इमारतीमध्ये होणाऱया आर्ट गॅलरी, सदाशिवपेठ भाजी मंडई, करंजे येथील होणारी पाण्याची टाकी आणि नवीन शाळा, माजगांवकरमाळ घरकुल योजना, हुतात्मा स्मारक, करिअप्पा चौक विकास, नवीन प्रशासकीय इमारत, कर्मवीर हौसिंग सोसा.मेडिटेशन हॉल इत्यादी ठिकाणच्या कामांची जागेवर जावून पहाणी केली.
योग्य नियोजन करता येईल
युनीयन क्लबचे पाठमागील बाजुस नगरपरिषदेची 57 गुंढे मोकळी जागा आहे, सदर जागेचा चांगला विनियोग करता येईल. युनियन क्लबशी बोलणी करुन, चांगले नियोजन करता येईल, या मोकळया जागेच्या उपयोगाबरोबरच युनियन क्लबची जुनी इमारतही नव्याने बांधून चांगली वास्तु याठिकाणी निर्माण करता येईल, असे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.
नगरपरिषदेच्या जुन्या इमारतीमध्ये आर्ट गॅलरीचा डिझाईनची पहाणी केली. याठिकाणी मुख्य इमारतीच्या वर दुसरा मजला वाढवून सुंदर अशी आर्ट गॅलरीची उभारणी करण्यात येणार आहे. नागरीकांना विविध प्रदर्शनासाठी एक चांगली वास्तु अस्तित्वात येईल.