शरद पवारांनी घेतली हिंदीतून, राजीव सातव, प्रियांका चतुर्वेदी यांनी घेतली मराठीतून,
प्रतिनिधी/ सातारा
लोकसभा निवडणुकित अगोदर राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आलेले उदयनराजे यांनी पुन्हा विधानसभा निवडणुकीच्यावेळी राजीनामा दिला होता. त्यावेळी श्रीनिवास पाटील यांचा विजय झाला होता. त्यानंतर भाजपने उदयनराजे यांना राज्यसभेवर संधी दिली गेली. राज्यसभेच्या खासदारकीची शपथविधी आज सभापतीच्या उपस्थितीत पार पडला. उदयनराजे यांनी इंग्रजीत, शरद पवार यांनी हिंदीत तर प्रियांका चतुर्वेदी आणि राजीव सातव यांनी मराठीमधून शपथ घेतली. उदयनराजे समर्थकांनी सातारा येथे जल्लोष केला.
सातारा लोकसभेची 2019 च्या निवडणुकीत सुरुवातीला खासदार उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीकडून निवडून आले होते. मात्र, तीन महिन्यांनी लागलेल्या विधानसभेच्या निवडणुकी अगोदर त्यांनी राजीनामा दिला होता. पुन्हा निवडणूक झाली त्यात राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील हे विजयी झाले होते. त्यानंतर उदयनराजे यांना भाजपच्या वरिष्ठकडून दिलेल्या शब्दानुसार त्यांची राज्यसभेच्या खासदारपदासाठी बिनविरोध निवड करण्यात आली होती. त्या पदासाठी आज शपथविधी सोहळा पार पडला. उदयनराजे यांनी इंग्रजीतून शपथ घेतली. त्यांनी शपथ घेतल्यानंतर सातारा शहरात समर्थकांनी जल्लोष केला. सोशल मीडियावर संदेश वर संदेश पडत होते.
लॉकडाऊन असल्याने जोरदार जल्लोष करता आला नसला तरीही कार्यकर्ते आपल्या गल्लीत गुलाल उधळून आनंद व्यक्त केल्याचे समजते.