अन्य उच्च अधिकाऱयांच्या वेतनात 15 टक्के कपात
नवी दिल्ली :
कोटक महिंद्रा समूहाचे मुख्य अधिकाऱयांनी कोरोनाच्या संकटत काळात वेतनात कपात करण्यात निर्णय घेतला आहे. कंपनीच्या नेतृत्वात स्वेइच्छा काम करत असणारे अधिकारी चालू आर्थिक वर्षात मिळणाऱया वेतनातील 15 टक्के कमी वेत न घेणार असल्याची घोषणा केली आहे. तर आर्थिक सेवा देणाऱया कंपनीचे प्रमुख व सीईओ उदय कोटक हे वर्षभर आपल्या वेतनातील 1 रुपया वेतन नाममात्र म्हणून घेणार आहेत. अशी माहिती बँकेकडून देण्यात आली आहे.
सध्या देशावर कोरोनाचे संकट आले आहे. यामध्ये विविध क्षेत्रातील उद्योगपत्ती आणि अन्य धनाढय़ व्यक्ती सरकारला मदत करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. याच स्थितीत कोटक महिंद्राने म्हटले आहे, की आम्ही यावेळी अशा युद्धात लढत आहोत की, जीवन आण ते जगण्यासाठी आवश्यक असणारे घटक या दोघांनाही सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी असल्याचे म्हटले आहे.
मदतीचा हात
या अगोदर बँकेने पीएम केअर्स निधीत 25 कोटी रुपयाची मदत केली आहे. तर कोटक यांनी वैयक्तिक पातळीवर 25 कोटींचा मदतीचा हात सरकारला दिला आहे.