प्रतिनिधी / शिवोली
शिवोलीत सामाजिक कार्यकर्ते तथा विद्यमान आमदार विनोद पालयेंकर यांचे थोरले बंधु उदय दत्ताराम पालयेंकर यांचे शुक्रवारी पहाटे सव्वासहाच्या दरम्यान निधन झाले. बांबोळीच्या सुपर स्पेशलिटी विभागात त्यांच्यावर गेले बावीस दिवस उपचार सुरु होते. शुक्रवारी पहाटे त्यांचा ऑक्सीजन लेवल कमी झाल्याने त्यांचा म्रुत्यू झाल्याचे कुटुंबियांनी सांगितले.
दरम्यान, शुक्रवारी दुपारी दांडा-शिवोली येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर कोवीड नियमांचे पालन करीत रितसर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यामागे पत्नी निरंजना तसेच छोटी मुलगी उर्वी तसेच भाऊ विनोद आणी आनंद पालयेंकर असा समस्त परिवार आहे. कोवीडग्रस्त असलेल्या उदय पालयेंकर यांच्यावर म्हापशाच्या अझिलोत महिन्याभरापुर्वी उपचार घेतल्यानंतर त्यांना तेथील डॉक्टरांकडून घरी पाठवण्यात आले होते परंतु दोन दिवसांनी त्यांची तब्येत पुन्हा बिघडल्याने त्यांच्यावर बांबोळीच्या कोवीड स्पेशलिटी विभागात गेले बावीस दिवस उपचार सुरु होते. शुक्रवारी सकाळी सहा सव्वासहाच्या दरम्यान त्यांच्यावर म्रत्यू ओढवल्याचे सुत्रांनी सांगितले. दरम्यान, उदय पालयेंकर यांच्या म्रुत्यूची माहिती मिळताच शिवोलीत दुःखाची छाया पसरली. सकाळी अकरा वाजता त्यांच्या म्रुतदेहावर कोवीड नियमांचे पालन करीत स्थानिक स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे छोटे बंधू तथा शिवोलीचे विद्यमान आमदार विनोद पालयेंकर यांनी त्यांना मुखाग्नी दिला…..