प्रतिनिधी /पणजी
ज्येष्ट कोंकणी साहित्यकि उदय म्हांबरे, कोंकणी भाषेचे अभ्यासक सुरेश बोरकर, कथालेखक अँथनी बारकूर यांना यावषीचे प्रतिष्ठेचा विमला पै साहित्य पुरस्कार जाहीर झाले. विश्व कोंकणी केंद्राच्यावतीने दरवषी हे पुरस्कार देण्यात येतात. प्रत्येकी एक लाख रुपये रोख, मानचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कोंकणी भाषेतील साहित्यनिर्मितीसाठी देण्यात येणारे हे सर्वोच्च पुरस्कार मानले जातात.
मंगलूरस्थित कोंकणी भास आनी संस्कृती प्रतिष्ठानच्या विश्व कोंकणी केंद्राच्यावतीने संस्थेचे अध्यक्ष नंदगोपाल शणै यांनी या पुरस्कारांची अधिकृत घोषणा केली. 2010 सालापासून टी.व्ही. मोहनदास पै यांनी आपल्या मातोश्रींच्या नावाने सदर पुरस्कार पुरस्कृत केले असून, कोंकणी भाषेतील ललित आणि ललितेत्तर साहित्य तथा जीवनगौरव पुरस्कारांचा यामध्ये समावेश होतो. कोंकणी चळवळीमधील सक्रीय कार्यकर्ते आणि प्रसिध्द कोंकणी साहित्यकि उदय म्हांबरे यांच्या ’इंद्रधनू उदेवं’ या काव्यसंग्रहाला कवितेसाठी देण्यात येणारा पुरस्कार जाहीर झाला आहे. उदय म्हांबरे यांचे ’काळीज उसवलां’ हा आत्मपर ललितसंग्रह आणि ’हंय सायबा’, ’मनशाच्या सोदांत’ आणि ’इंद्रधनू उदेवं’ हे काव्यसंग्रह प्रसिध्द झाले आहेत.
यावषी जीवनसिध्दी पुरस्कारासाठी सुरेश बोरकर यांनी निवड करण्यात आली असून, कोंकणी भाषा, अध्यापन शास्त्र, व्याकरण, कोश विज्ञान ह्या क्षेत्रांत निरंतर मौल्यवान योगदान दिल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर कथालेखक अँथनी बारकूर (अँथनी प्रकाश डिसूजा) यांच्या ’मासां’ या कथासंग्रहाला गद्य ललित साहित्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. विश्व कोंकणी केंद्राच्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळय़ामध्ये या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
अड. उदय भेंब्रे, डॉ. किरण बुडकुले, पय्यनूर रमेश पै, मेल्वनि रॉड्रिगस, गोकुलदास प्रभू यांच्या परिक्षक मंडळाने या पुरस्कारार्थीची एकमताने निवड केली.