आमदार शिवेंद्रराजेंचा खासदार उदयनराजेंच्यावर निशाणा
प्रतिनिधी/ सातारा
उद्घाटनांना मी जास्त महत्व देत नाही, कामे होणे आणि निधी आणणे याला मी महत्व देतो. दर्जेदार कामे होणे याला जास्त महत्व आहे. माझे जे कर्तव्य आहे ते मी पार पाडतो आहे. कोण काय बातम्या देते, कोण फोटो काढून काय करतय याला काय फार महत्व देण्यात अर्थ नाही. आजपर्यंत केंद्रातून किती निधी आणला?, तसे बघितले तर सातारसाठी काहीच आले नाही. ही वस्तूस्थिती आहे. ते दिल्लीच्या अधिवेशनाच्या काळात कुठे असतात?, त्याच खासदारांनीच उत्तर दिले पाहिजे. अधिवेशनाच्या हजेरीप्रमाणेच ते डीपीसीला तरी कुठे हजर असतात, असाही आरोप खासदार उदयनराजेंच्यावर आमदार शिवेंद्रराजेंनी पत्रकारांशी बोलताना केला आहे.
सुऊची बंगल्यावर पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, महाराष्ट्र सरकारचं सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुऊ आहे. यापूर्वी पण राज्य शासनाकडून सातारा नगरपालिकेला विविध योजनांसाठी माझ्या मागणीप्रमाणे आणि पाठपुराव्याप्रमाणे भरपूर निधी मिळाला आहे. आताच्या अधिवेशनात 6 कोटी 70 लाख ऊपये सातारा शहरातील आणि नवीन आलेल्या हद्दवाढीच्या भागासाठी विविध विकास कामासांठी मंजूरी मिळाली आहे. बऱ्याच प्रभागातील रस्ते, काही ठिकाणी मोकळ्या जागा आहेत, त्याचे डेव्हलप करायचे प्रस्ताव होते, काही ठिकाणी बाग बगिचे आहेत, त्या ठिकाणी व्यायामाचे साहित्य बसवण्याच्या मागण्या होत्या. अशी वेगवेगळी कामे 6 कोटी 70 लाखात मिळाली आहेत. अतिशय जलद गतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निधी आपल्याला उपलब्ध कऊन दिला. एकदा बजेट झाले की पुढे एप्रीलच्या दरम्यान, अजून पण निधीसाठी मागणी केली आहे. शहरातील प्रमुख रस्ते कायम स्वऊपी करण्यासाठी काँक्रीटीकरणाचा प्रस्ताव मी दिलेला आहे. जिथे वाहतूक जास्त आहे, तिथे काँक्रीटचे रस्ते करण्यासाठी माझा पाठपुरावा सुऊ आहे. लवकर त्यास मान्यता मिळेल. ही कामे मी आमदार म्हणून राज्यसरकारकडून पाठपुरावा कऊन आणतोय. आमदार म्हणून निधी आणला आहे. दुसऱ्याच्या कामाला माझे काम आहे म्हणून सांगायला गेलेलो नाही. मी उद्घाटनाला जास्त महत्व देत नाही, कामे होणे, जास्तीत जास्त निधी आणणे याला महत्व आहे. दर्जेदार कामे होणे याला जास्त महत्व आहे. माझे जे कर्तव्य आहे ते मी पार पाडतो आहे. आजपर्यंत केंद्रातून तसे बघितले तर सातारसाठी काहीच आले नाही. ही वस्तूस्थिती आहे, अशी टीप्पणी आमदार शिवेंद्रराजेंनी केली.
पुढे ते म्हणाले, ज्या काही इतर योजना आहेत. सातारकरांच्या किती उपयोगाच्या झाल्या. कास धरणाचे कामाची पहिली पण मान्यता मीच अजितदादांकडून मंजूर कऊन आणली. सुधारित प्रशासकीय मान्यता पण मीच मिळवून आणली. दादांच्या माग लागून ते काम केले. या उलट ग्रेड सेपरेटरचे सातारकरांसमोर मुर्तीमंत उदाहरण आहे. ग्रेड सेपरेटरचा प्रकार आपण बघतो आहोत. ग्रेड सेपरेटरवर एवढा निधी खर्च केला काय उपयोग झाला. लोकांना उपयोगापेक्षा अडचणीच जास्त व्हायला लागली आहे. लोकांच्या अपेक्षेप्रमाणे मी कामे करतो. सगळ्यापेक्षा माझी वेगळी बुद्धी आहे, मी किती हुशार आहे, असले दाखवायचे मला जमत नाही. माझी कामे माझ्या पद्धतीने सुऊ आहेत, असेही त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.
डीपीसीत ते असतात कुठे?
सातारचे खासदार अधिवेशनात असतात का या प्रश्नावर ते म्हणाले, त्याच उत्तर खासदारांनी उत्तर दिले पाहिजे. अधिवेशनाच्या काळात ते कुठे असतात. अधिवेशानाप्रमाणेच डीपीसीचा सुद्धा तसाच विषय आहे. नगरपालिकेपासून बोगद्याला जाणारा रस्ता आहे. त्याचा पण उदयनराजेंनी नारळ फोडला. ज्या डीपीसीतून काम मंजूर झाले. त्या डीपीसीला ते हजर होते का?. कामे मंजूर केली की मी केली, नाही झाली की बाकीच्यावर ढकलून द्यायचे आणि काम झाले की मीच केलं हा अविर्भाव दाखवायचा. आता सातारकर याला भूलणार नाहीत. लुटून खाण्याचा पाच वर्षाचा कारभार सातारकरांनी बघितला आहे. नेत्यांपासून सगळयापर्यंत खाण्याची शर्यत लागली होती. शहराच्या विकास कामाबरोबरच सौदर्य वाढवणे बाजूलाच टेडर, कॉन्ट्रक्टर, त्यातून कमिशन मिळवून देणे, हेच सातारा विकास आघाडीने केले आहे, असाही आरोप त्यांनी केलेला आहे.