मुंबई \ ऑनलाईन टीम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे, अशा भावना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त व्यक्त केल्या. यावरून वक्तव्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे . उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेता व्हावं पण राष्ट्रवादीपेक्षा मोठं नाही, असं राऊतांना वाटतं, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी टीका केली आहे.
संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांनी राष्ट्रीय नेता व्हावं, असं म्हटलं. असं वाटत असेल ते चांगलंच आहे. उद्धव ठाकरेंनी नक्की मोठं व्हावं, असं फडणवीस म्हणाले. तर राऊतांना टोमणा मारताना उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेता व्हावं पण राष्ट्रवादीपेक्षाही मोठं नाही, असं राऊतांना वाटतं, असं फडणवीस म्हणाले.तसेच, मुख्यमंत्र्यांना फोन करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असल्याचंही फडणवीसांनी सांगितलं.
संजय राऊत काय म्हणाले होते ?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रत्येकाला आपले कुटुंब प्रमुख वाटतात. हे त्यांच्या नेतृत्वाचं यश आहे. घरातला माणूस नेतृत्व करतो, असं प्रत्येकाला वाटतं. हे नेतृत्व प्रदीर्घ काळ टिकेल. राष्ट्रालाही त्यांच्या संयमी, प्रखर राष्ट्रवादी आणि हिंदुत्वावादी नेतृत्वाची गरज आहे. ते देशाला नेतृत्व देतील, अशा शुभेच्छा मी त्यांना देतो, असं राऊत म्हणाले होते.