ऑनलाईन टीम / मुंबई :
कंगनाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करणे चांगलेच महागात पडणार आहे. याबाबत वकील नितीन माने यांनी विक्रोळी पोलीस ठाण्यात कंगना विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कंगनाच्या बेकायदा बांधकामावर केलेल्या कारवाई प्रकरणी कोणत्याही प्रकारे थेट संबंध नसतानाही उद्धव ठाकरेंवर आरोप करत बदनामी केल्याचा तक्रारदाराचा आरोप आहे. कंगनाने ट्विट करत मुख्यमंत्र्यांवर आरोप केले आहेत.
काल कंगनाने एक व्हिडिओ ट्विट करत, ‘आज माझं घरं तुटलंय, उद्या तुमचा अंहकार तुटेल.’ असे वक्तव्य केले होते. मुंबई महापालिकेने कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केल्यामुळे कंगना आक्रमक झाली आहे. कंगनाने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना आव्हान दिलं.
याप्रकरणी विक्रोळी कोर्टातही अब्रुनुकसानीचा खटला कंगनाविरोधात चालवला जाणार असल्याचे समोर आले आहे.