प्रतिनिधी/ बेळगाव
110 केव्ही उपकेंद्र उद्यमबाग येथे नवा विद्युत परावर्तक बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे उद्यमबाग उपकेंद्रातील परिसरात रविवार दि. 9 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 यावेळेत वीजपुरवठा खंडित राहणार आहे. खानापूर रोड, उद्यमबाग औद्योगिक विभाग, राणी चन्नम्मानगर, तिसरे रेल्वेफाटक, वसंत विहारनगर, सुभाषचंद्र कॉलनी, उत्सव हॉटेल, डच इंडस्ट्रियल एरिया, बेम्को इंडस्ट्रियल एरिया, अशोक आयर्न इंडस्ट्रियल एरिया, अरुण इंजिनिअरिंग इंडस्ट्रियल एरिया, एकेपी इंडस्ट्रियल एरिया, गॅलॅक्सी इंडस्ट्रियल एरिया, जीआयटी, महावीरनगर, समेदनगर, ज्ञान प्रबोधन शाळा परिसर, गुरुप्रसाद कॉलनी, मंडोळी रोड, कावेरी कॉलनी, पार्वतीनगर, विश्वकर्मा कॉलनी, वामिनाथ कॉलनी, नित्यानंद कॉलनी, डिफेन्स कॉलनी, वाटवे कॉलनी, जैतनमाळ आदी परिसराचा वीजपुरवठा खंडित होणार आहे, असे हेस्कॉमतर्फे कळविण्यात आले आहे.
मच्छे–खानापूर विभागात आज वीज नाही
दुरुस्तीच्या कारणास्तव 110 केव्ही मच्छे उपकेंद्रावरील व खानापूर तालुक्मयातील काही गावांचा वीजपुरवठा रविवार दि. 9 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 6 यावेळेत खंडित करण्यात येणार आहे. मच्छे, झाडशहापूर, देसूर, बाळगमट्टी, कुट्टलवाडी, बामनवाडी, नावगे, जानेवाडी, बहाद्दरवाडी, रणकुंडये, कर्ले, किणये, संतिबस्तवाड, काळेनट्टी, मार्कंडेयनगर, वाल्मिकीनगर, तीर्थकुंडये, हुंचेनहट्टी, अशोक आयर्न कॉलनी, नावगे, वाघवडे, मच्छे औद्योगिक विभाग तर खानापूर तालुक्मयातील उचवडे, कुसमळी, बैलूर, मोरब, जांबोटी, ओलमणी, वडगाव, दारोळी, चापोली, कापोली, मुडवी, हब्बनहट्टी, देवाचीहट्टी, तोराळी, गोल्ल्याळी, बेटगेरी, तळेवाडी, आमटे, कालमणी, चिकले, कणकुंबी, गवसे, आमगाव, बेटणे, पारवाड, चिगुळे, मान, सडा, चोर्ला, जुने व नवे हुळंद या गावांतील वीजपुरवठा खंडित होणार असल्याचे हेस्कॉम ग्रामीण विभागाकडून कळविण्यात आले आहे.