प्रतिनिधी/ बेळगाव
शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने उद्यमबाग येथील एफएल एक्स्पर्ट कारखान्यामध्ये रोगप्रतिकार शक्तीवर्धक गोळय़ांचे वाटप करण्यात आले. रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या नागरिकांना कोरोनाचा धोका संभवत असल्याने आर्सेनिक अल्बम-30 या होमिओपॅथिक गोळय़ांचे वाटप करण्यात आले.
यावेळी शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस किरण गावडे म्हणाले, रोग प्रतिकारशक्ती कमी होऊन कोरोना रुग्णांमध्ये वाढ होऊ नये याकरिता शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने शहराच्या विविध भागात आर्सेनिक अल्बम-30 गोळय़ांचे वितरण करण्यात येत आहे. उद्यमबाग येथे कामगारांची संख्या जास्त असल्यामुळे येथील विविध कारखान्यांमध्ये जाऊन शहर समितीचे पदाधिकारी कामगारांना गोळय़ा वितरित करीत असल्याचे सांगितले. कंपनीचे संचालक नितीन भोसले, किरण परब, किरण बडवाण्णाचे यासह कारखान्यातील कर्मचारी उपस्थित होते.