राष्ट्रवादीच्या खेळीला भाजपा कसे रोखणार?
प्रतिनिधी/ सातारा
कोरोनामुळे जिल्हा बँकेला मुदतवाढ मिळाली होती. त्याच बँकेच्या निवडणूकीच्या अनुषंगाने सभासदांचे ठराव मागणी सुरु झाली आहे. त्याच उद्यापासून सुरुवात झाली आहे. मुळात जिल्हा बँक ही शेतकऱयांच्या कर्जावर चालते परंतु पुढाऱयांचा त्या कंट्रोल आहे. ज्या पक्षाचे पुढारी त्या पक्षाची बँक आहे. याच बँकेच्या निवडणूकीसाठी आता हालचाली सुरु झाल्या असून उद्यापासून ठराव मागणी प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या खेळय़ांना भाजपा कसं रोखणार?, आमदार जयकुमार गोरे यांची या चाल असणार?, शिवसेनेचा शिरकाव बँकेत होणार काय?, उदयनराजे शिवेंद्रराजे एकत्रपणे येतील काय अशी उलटसुलट चर्चा सुरु आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँक ही प्रत्येक निवडणूकीच्या प्रचाराचे प्रमुख केंद्र आहे. मग लोकसभा असू या विधानसभा. बँकेतील सर्व कर्मचारी, विकास सेवा सोसायटय़ांचे सचिव यांच्यावर निवडणूकीच्या प्रचारावेळी हॅमरिंग केले जाते, अशी चर्चा वारंवार होते. शेतकऱयांच्या नावाने चालणाऱया या जिल्हा बँकेवर आजपर्यंत राष्ट्रवादीच्याच ताब्यात सत्ता राहिली आहे. स्व. सहकारमंत्री विलास काका यांचाही बँकेत ऐककाळी दबदबा होता. त्यांच्याबरोबरच माजी खासदार स्व. लक्ष्मणराव तात्यांचाही दबदबा होता. आताही भाजपाचे आमदार शिवेंद्रराजे चेअरमन असले तरीही सत्ता राष्ट्रवादीची आहे. या लागणाऱया निवडणूकीत मात्र कोणाच्या पॅनेलमध्ये कोण असेल?, कशी निवडणूक होईल हे मात्र अजून तरीही गलदस्त्यातच आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस बँक ताब्यात राहण्यासाठी आपल्या खेळय़ा, डाव टाकायला सुरुवातही झालेली असावे. त्याचीच चर्चा सध्या रंगत आहे ती म्हणजे आमदार जयकुमार गोरे यांच्याबाबतीत आहे. त्यामुळे आता आमदार जयकुमार गोरे हे नेमका कोणता डाव टाकतात. त्यांची चाल कशी असणार भाजपा कसे रोखणार याकडे नजरा असून पाठीमागे त्यांनी बँकेच्या विरोधात बँकेच्यासमोरच मोठे आंदोलन केले होते. धरणे आंदोलन करुन बँकेला धडकी भरवली होती. बँकेच्या समोरील या आंदोलनामुळे व त्यावेळी झालेल्या आरोपामुळे बँकेच्या विरोधात बोलण्याचे आणि लिहण्याचे धाडस झाले होते. आताही या निवडणूकीत बँकेला राष्ट्रवादीकडून विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक – निंबाळकर यांच्यासह पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे विशेष लक्ष असणार अहे. उद्यापासून सुरु होणाऱया बॅकेच्या निवडणूकीच्या अनुषंगाने आपल्याच बाजूने ठराव जास्त कसे होतील यासाठी त्यांचे पुरते लक्ष आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या येवू घातलेल्या निवडणूकीकडे सगळय़ांच्या नजरा आहेत.