50 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी
वृत्तसंस्था/ रायगढ
देशातील दिग्गज उद्योगपतींपैकी एक नवीन जिंदल यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. छत्तीसगडच्या तुरुंगातील एका कैद्याने पत्राद्वारे जिंदल यांना धमकाविले आहे. 48 तासात 50 कोटी रुपये न मिळाल्यास जीव घेऊ असे या पत्रात नमूद आहे. जिंदल यांना धमकीचे पत्र मिळाल्यावर पोलिसांनी तातडीने पावले उचलली आहेत. तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे. जिंदल स्टील अँड पॉवर लिमिटेडचे अध्यक्ष नवीन जिंदल यांच्या नावाने हे पत्र पोहोचले होते. कंपनीचे महाव्यवस्थापक सुधीर रा यांनी 23 जानेवारी रोजी हे पत्र प्रथम वाचले होते. या पत्रातून खंडणीची मागणी करण्यात आली आहे. पत्र लिहिणाऱया व्यक्तीने आपण विलासपूर तुरुंगातील कैदी असल्याचे नमूद केले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.