गौरी आवळे / सातारा :
खांद्यावर असलेली कुटुंबाची जबाबदारी सोबत घेऊन प्रयत्न, अपार कष्ट आणि होणारा नफा-तोटा असे व्यवसायाचे गणित जुळवत माधुरी शेखर कांबळे या व्यवसाय क्षेत्रात वाटचाल करत आहेत. कोणताही व्यवसाय फक्त पुरूषच करू शकतात. हा विचार त्यांनी मोडीत काढला आहे.
बदलत्या काळानुसार घर सजवण्यावर प्रत्येकजण भर देत आहे. घर सजवण्यामध्ये आता टाईल्स आणखी भर टाकत आहेत. यामुळे सातारकर नागरिकांना पुणे-मुंबई येथे न जाता चांगल्या दर्जाच्या टाईल्स साताऱ्यातच मिळाव्यात म्हणून साताऱ्यातील संगमनगर येथे 2003 साली माधुरी कांबळे व त्यांचे पती शेखर कांबळे यांनी क्रिएटिव्ह टाईल्स हा व्यवसाय सुरू केला. व्यवसायांची 70 टक्के जबाबदारी माधुरीताईंनी आपल्या खांद्यावर घेतली. कर्मचाऱयांची नेमणूक करणे, आर्थिक देवाण-घेवाण, ग्राहकांच्या मागणीनुसार टाईल्स पुरविणे अशी कामे त्यांनी करत व्यवसाय वाढविण्यावर लक्ष केंद्रीत केले.
शोरूममध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकांना उत्तम दर्जाच्या टाईल्स मिळाल्या पाहिजेत हा त्यांचा हेतू आहे. आपण करत असलेल्या व्यवसायातून फक्त नफा नको तर ग्राहकांचे समाधानही झाले पाहिजे. म्हणून त्या ग्राहकांच्या मागणीला प्राधान्य देतात. त्यांच्याकडे अल्प दरात उत्तम दर्जाच्या टाईल्स आहेत. संगमनगर, नागठाणे येथे क्रिएटिव्ह टाईल्स शोरूम आहेत. यासोबत पुणे-मुंबई येथील ग्राहकांनाही अल्प दरात उत्तम दर्जाच्या टाईल्स मिळाव्यात म्हणून शोरूम सुरू झाले आहेत. टाईल्स खरेदीसाठी या शोरूममध्ये ग्राहकांची गर्दी होत आहे. नवनवीन डिझाईन ग्राहकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू बनल्या आहेत.
टाईल्स खरेदी करायच्या तर क्रिएटिव्ह टाईल्स या शोरूममधूनच ही मागणी ग्राहकांकडून होत आहे. व्यवसायात आणखी एक पाऊल पुढे टाकत त्यांनी सीआरटी टाईल्स नावाने स्वत:चे मॅन्युफॅक्चरींग सुरू केले आहे. गोव्यातही शोरूम सुरू झाले आहेत. माधुरीताईंना सामाजिक कार्याची आवड आहेत. दोघेही गरीब, गरजुंना मदत करण्यास नेहमी पुढाकार घेतात. अनेक उपक्रम राबवतात. यामुळे सामाजिक क्षेत्रात त्यांचा आधार अनेकांना मिळत आहे. सामाजिक कार्यकर्त्या अशी त्यांची ओळख आहे. वैयक्तिक जीवनातही माधुरीताई या सर्वांच्या विचारांचा सन्मान करतात. शोरूममधील कर्मचाऱयांना त्या आपुलकीची वागणूक देतात. महिलांनी महिलांचा आदर केला पाहिजे. हा विचार त्या सर्वांच्या मनात रूजवत आहेत. त्यांच्या सख्ख्या जाऊबाई रुपाली राकेश कांबळे यांचे प्रत्येक कामात त्यांना सहकार्य मिळत असते. दोघींही एकमेकीना सोबत घेवून काम करतात. दोघीही व्यवसाय आणि घराचा भक्कम आधार आहेत. 21 साव्या शतकात महिलांनी सक्षम झाले पाहिजे. कटुंबाइतकीच व्यवसायाची जबाबदारी मोठी असते. ही पार पाडताना तुम्ही ठाम राहून निर्णय घेतले पाहिजे. ही शिकवण त्या इतरांना देतात. क्रिएटिव्ह टाईल शोरूम ग्राहकांच्या हक्काचे ठिकाण बनले आहे.
स्वप्ने मोठी पहा, उज्ज्वल भविष्य घडेल
कोणत्या क्षेत्रात काम करताना संघर्ष करण्याची तयारी ठेवली पाहिजे. नफा-तोटय़ापेक्षा येणारी अनुभव आपल्याला मोठा करत असतो. म्हणून स्वत: वर विश्वास ठेवा आणि पुढे पुढे वाटचाल करा. तरच उज्ज्वल भविष्य घडवण्यात तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही.
– माधुरी शेखर कांबळे, क्रिएटिव्ह टाईल्स