ओटवणे / प्रतिनिधी:
ओटवणे येथील उद्योजक तथा सेवाभावी व्यक्तिमत्व सुरेश तावडे यांनी ओटवणे येथील रवळनाथ मंदिरला ३५ के व्हिचा जनरेटर प्रदान केला.
ओटवणे गावचे सुपुत्र असलेले सुरेश तावडे यांनी यापूर्वीही ओटवणे गावच्या शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक तसेच कला, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांसाठी वेळोवेळी योगदान दिलेले आहे. यावेळी सुरेश तावडे यांनी रवळनाथ मंदिर ला जनरेटर दिल्याबद्दल त्यांचे देवस्थान मानकरी व स्थानिक देवस्थान कमिटीने आभार मानले. यावेळी सुरेश तावडे यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. यावेळी देवस्थान कमिटी अध्यक्ष रवींद्र गावकर, ओटवणे शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष बाबाजी गावकर, दत्ताराम गावकर, दशरथ गावकर, यशवंत गावकर, नाना गावकर, पांडुरंग गावकर, बाबल गावकर, प्रमोद गावकर, सगुण गावकर, आनंद गावकर, बाळा गावकर, गुरु गावकर, श्रीकांत गावकर आदी उपस्थित होते.