उन्हाळा सुरू होत आहे. या दिवसात घाम शोषून घेणारे, आरामदायी आणि सैल कपडे घालणं आवश्यक असतं. या दिवसात काळे किंवा गडद रंगांचे कपडे त्रासदायक ठरू शकतात. म्हणूनच उन्हाळ्यातले फॅशन फंडे जाणून घ्यायला हवेत.
- उन्हाळ्यात पांढरा रंग थंडावा देतो. म्हणूनच पांढर्या रंगाचे कपडे तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायला हवेत. पांढरे कुर्ते, टॉप्स, शर्ट, सलवार कमीझ, ट्राउझर्स, मॅक्सी ड्रेस घालता येतील.
- उन्हाळ्यात फॅशन करताना प्रिंट्सची निवडही चोख असायला हवी. फिकट रंगाचे फ्लोरल प्रिंटवाले कपडे ट्राय करता येतील. फ्लोरलसह चेक्स, स्ट्राईप्स तसंच जिओमॅट्रिक प्रिंट्सवाले कपडेही घालता येतील.
- उन्हाळ्यात तंग कपडे घालू नका. त्याऐवजी शॉर्ट ड्रेस, मॅक्सी ड्रेस, कॉटन टी शर्ट, पलाझो, कुर्ते, प्लीटेड स्कर्ट, व्हाईट शर्ट, लिनन साडी, जॅकेट अशा पर्यायांची निवड करा.
- संध्याकाळच्या समारंभासाठी सोनेरी किंवा चंदेरी रंगाचे कपडे ट्राय करा. चंदेरी साडी किंवा ड्रेस खूप सुंदर दिसेल. तुम्ही मॅक्सी ड्रेसही घालू शकता. वन शोल्डर, ऑफ शोल्डर ड्रेसही चालून जाईल.
- उन्हाळ्यातल्या लग्नांमध्ये गडद रंगाचे कपडे त्रासदायक ठरू शकतात. म्हणूनच तुम्ही सोनेरी, चंदेरी शेड्ससह ऑलिव्ह ग्रीन, पीच, गुलाबी असे रंग घालता येतील.