वार्ताहर/ राजापूर
मुंबई गोवा महामार्गावरील राजापूर उन्हाळे कुंभारवाडी येथे मालवाहू ट्रक रस्त्यालगत भरावाच्या मातीत रुतल्याने झालेल्या अपघातात ट्रेकचे नुकसान झाले आहे.
या बाबत मिळालेल्या माहितीनुसार गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा मालवाहू ट्रक सोमवारी सायंकाळी उन्हाळे कुंभारवाडी नजीक आला असता वळणावर रस्त्याच्या कडेला असलेल्या भरावाच्या मातीत रुतला. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र ट्रेकचे मोठे नुकसान झाले आहे.
सद्यस्थितीत मुंबई गोवा महामार्गाचे काम सुरू असून कुंभारवाडी येथिल काही भागाचे काम अपूर्ण आहे. या जुन्या रस्त्याच्या बाजूला मातीचा भराव टाकण्यात आला असून या मातीत ट्रक रुतुन अपघात घडला आहे.