प्रतिनिधी /फोंडा :
फोंडा बुधवार पेठच्या मार्केट प्रकल्पासमोर उन-पावसांच्या जोरदार सरीत माटोळी बाजार कोणतेही सामाजिक अंतर न राखता बिनधास्तरित्या सुरू आहे. कोरोना महामारीचे कोणतेही सोयरसुतक लोकांनी पाळलेले नाही. उत्सवाच्या मुडमध्ये लोक माटोळी बाजारहटीचा आनंद लुटत आहे. आज भरणाऱया तयेचा बाजारालाही ओसंडून गर्दी असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
बुधवारच्या आठवडी बाजरापासून सुरू झालेल्या चतुर्थीच्या माटोळी बाजाराला पहिल्यादिवशी अल्प प्रतिसाद लाभला. त्यानंतर कालच्या दिवशी बाणस्तारी येथील माटोळी विक्रेते व खेडे गावातील रानटी साहित्याची रेलचेल मोठया प्रमाणात वाढल्याने फोंडयातील बाजार बऱयाच कालावधीनंतर ग्राहकांनी गजबजलेला पाहायला मिळाला. सामाजिक अंतराचा मात्र फज्जा उडालेला सर्वत्र दिसला. चतुर्थीचा आनंदावर आधी कोरोनाने व नंतर महागाईमुळे विरजण पडलेले आहे तरीही लोकांमध्ये चतुर्थीचा उत्साह कायम आहे. बागायतदार बाजार व इतर सर्वत्र ठिकाणी गर्दीचा माहोल दिसत आहे.
रस्त्याशेजारी थाटण्यात आलेल्या फटक्याची दुकानावर मात्र ग्राहकांची रेलचेल कमी होती. फटाक्यावर बंदी असल्याने बहुतेकजण यंदा फटाक्याकडे आकर्षित होत नसल्याचे चित्र दिसत आहे. एकंदरीत आज होणाऱया चतुर्थीपुर्वीचा तयेचा बाजार गजबजण्य़ाची चिन्हे आहे.