बैलहोंगल येथील पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी /बेळगाव
गेल्या 20 दिवसांपूर्वी बैलहोंगल उपकारागृहातून फरारी झालेल्या कैद्याला बैलहोंगल पोलिसांनी अटक केली आहे. जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.
खादीरसाब मदारसाब राजेखान (रा. सत्तीगेरी, ता. सौंदत्ती) असे त्याचे नाव आहे. 16 मार्च 2022 रोजी बैलहोंगल उपकारागृहातून खादीरसाब फरारी झाला होता. त्याच दिवशी साहाय्यक जेलर डी. आर. कोणी यांनी बैलहोंगल पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती.
पोलीस निरीक्षक यु. एच. सातेनहळ्ळी, उपनिरीक्षक प्रवीण गंगोळ, जी. एस. आलदकट्टी, एल. बी. हमानी, जगदीश गुडली, सन्ननायक आदींनी ही कारवाई केली आहे. खादीरसाबवर एकूण सहा गुन्हे नोंद आहेत. मुरगोड पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात झालेल्या खुनी हल्लाप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती.