नवजात बालकाच्या त्वचेवर जन्मखुणा असतात.त्या त्वचेच्या रंगापेक्षा निराळ्याच असतात. बर्याचदा नवजात बालकांच्या अंगावर लाल किंवा इतर काही प्रकारच्या जन्मखुणा असतात. जन्मानंतर काही काळाच्या अवधीत ते नाहीसे होऊ शकतात. त्वचेला लागून असणार्या रक्तवाहिन्यांमुळे ह्या खुणा दिसतात.
त्वचेचे पिग्मेंटेशन झाल्याने अतिरिक्त रक्तवाहिन्या निर्माण होणे हे या जन्मखुणांमागील सर्वात मोठे आणि महत्त्वाचे कारण आहे.
बहुतांश वेळा या जन्मखुणा त्रासदायक नसतात त्यामुळे त्यांच्यावर काही उपचार करण्याची गरज नसते. अर्थात लाल रंगाच्या काही जन्मखुणांमुळे त्रास होऊ शकतो. या जन्मखुणांपैकी अगदी अल्प प्रमाणातील खुणाच रक्तवाहिन्यांच्या गाठी किंवा टय़ूमरमध्ये परावर्तित होतात. त्याला हेमेन्गिओमस म्हटले जाते. या डागामुळे एखाद्या व्यक्तीला तणाव किंवा वेदना होत असतील तरीही त्यावर उपचार करुन घ्यायला हवेत. हा डाग जर बालकांच्या डोळ्याजवळ असेल तर त्यावर नक्कीच उपचार करुन घेतले पाहिजेत कारण काही वेळा त्याचा दृष्टीवर परिणाम होऊ शकतो. ङया उपचारांमध्ये लेसर उपचारांपासून कॉस्मेटिक उपचारांपर्यंत इतरही काही उपचार पद्धती वापरता येतात. त्याशिवाय औषधे आणि इंजेक्शनचा उपचारात समावेश करता येऊ शकतो