प्रतिनिधी / काणकोण
काणकोण तालुक्यात कोविड प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाच्या तिसऱया टप्प्यात उपजिल्हाधिकारी आणि मामलेदार कार्यालयांतील कर्मचाऱयांना लस देण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी सतीश प्रभू, मामलेदार विमोद दलाल आणि अन्य कर्मचाऱयांनी लस घेतली. यापूर्वी सामाजिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर्स, परिचारिका आणि अन्य कर्मचाऱयांना कोविड लस देण्यात आली होती. यानंतर 50 वर्षांवरील व्यक्तींना कोविशिल्ड लस देण्यात यणार असल्याची माहिती काणकोणच्या सामाजिक आरोग्य केंद्राचे अधिकारी जुझे तावारीस यांनी दिली.