निवेदन द्यायला आलेल्या महिला आनंदी होवून परतल्या
प्रतिनिधी/ सातारा
शहरातील कोणत्याही भागातील नागरिक तक्रार घेवून पदाधिकाऱयांकडे गेल्यानंतर त्यांच्याकडून त्या नागरिकांना समस्या ऐकून घेवून समाधानकारक उत्तर मिळाले तर नागरिकांना बरे वाटते. त्याचाच प्रत्यय आज शाहुनगर भागातील महिलांना आला. रस्त्यासाठी निवेदन घेवून आलेल्या महिलांनी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांचे कामकाज पाहून सर्वच महिला अचंबित झाल्या अन् जाता जाता एकच वाक्य अभिनंदनाच्या बोलल्या. पदाधिकारी असावा तर असा. उपाध्यक्ष असावेत तर असे असे गौरवोद्गार काढून गेल्या. दरम्यान, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी बांधकामचे अभियंता सुधीर चव्हाण यांना पाहणी करुन प्रस्ताव देण्याच्या सुचना केल्या. त्यांनीही तेथे भेट देवून पाहणी केली.
पदाधिकारी जर काम करणारा असेल नागरिकांच्या समस्यांचे निराकारण करणारा असेल तर त्यांची छाप नागरिकांच्यामध्ये पडते. त्यांच्या नेत्यांची छाप पडते. सातारा नगरपालिकेत शुक्रवारी दुपारी शाहुनगर येथील हिलटॉप सोसायटी परिसरातील काही महिला रस्त्याच्या मागणीचे निवेदन घेवून आल्या. निवेदन उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांच्या हाती महिलांनी दिले. उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी ते वाचले अन् लगेच शिपायास बोलवून घेवून अभियंता सुधीर चव्हाण यांना केबीनमध्ये बोलवून घेत त्या रस्त्याबाबत माहिती विचारली. अभियंता सुधीर चव्हाण यांनी तो रस्ता केवळ 300 मीटरचा असून 5 मीटर रुंदीचा आहे. त्यावर प्रस्ताव तयार करुन टाका प्रत्यक्ष जागेवर जावून पाहणी करा. गटर आहे की नाही हे पहा, अशा सुचना दिल्या. त्यावर अभियंता सुधीर चव्हाण यांनी त्या महिलांना रस्त्याचे काम होईल असे सांगितले. महिलांनी रस्ता होत नसल्याने गैरसोय कशी होते हे सांगत सातारा पालिकेत आम्हाला उपनगराध्यक्ष म्हणून सकारात्मक लोकप्रतिनिधी अनुभवायला मिळाले. खूप छान कामकाज होत आहे, असे उद्गार त्या महिलांनी काढले. दिलेल्या आदेशानुसार अभियंता सुधीर चव्हाण यांनी तेथे जावून पाहणीही केली.