प्रतिनिधी/ सातारा
काही सभापतीना स्वतःच्या केबिनमध्ये जायला यायला सुद्धा भीती वाटते. समाजकल्याण सभापतीचे केबिन तर धुळीने माखले आहे. आरोग्य सभापती बाबत न बोललेच बरं. पाणी पुरवठा सभापती सध्या आजारी आहेत. बांधकाम सभापती आणि नियोजन सभापतीचे वेगळे सांगायला नको.अशा परिस्थितीत उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी जेथे कमी तेथे उपनगराध्यक्ष आहेत असे सूत्र त्यांनी हाती घेतले आहे.पाण्याची गळती असो की शहरातील कचरा असो की लाईट लागेना कुठे कसलीही तक्रार असो नागरिकांनी कुठल्याही वॉर्डात न भीती बाळगता थेट उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांना फोन करून कळवली की ती तक्रार सोडवण्यासाठी दस्तुरखुद्द उपनगराध्यक्ष मनोज शेंडे हे प्रयत्न करतात.आणि ती तक्रार सोडवण्यासाठी अगदी पिच्छा करतात.त्यामुळे सातारा पालिकेत ही उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी प्रशासनास काम कसे करायचे याचीच शिस्त लावली आहे.त्यामुळे दररोज त्यांच्या केबिनमध्ये नागरिकांची गर्दी पहायला मिळते.
स्वतः ऑन दि उपाध्यक्ष केवळ तक्रार आली म्हणून केवळ सुचना देऊन थांबत नाहीत तर उपाध्यक्ष मनोज शेंडे हे प्रत्यक्ष ऑन दि स्पॉट जाऊन काम झाले की नाही याची पहाणी करतात.चुकीचे काम होत असले तर लगेच काम सुधारण्यासाठी सूचना करतात.ऑन दि स्पॉट उपनगराध्यक्ष मनोज शेंडे हे जातात.अन समस्या सोडवतात