प्रतिनिधी / सांगली
गुरूवारी जिल्हय़ात नवीन 70 रूग्ण वाढले. त्यामुळे एकूण रूग्णसंख्या 1384 झाली आहे. तर 48 जण कोरोनामुक्त झाले आहेत. गुरूवारी जिल्हय़ातील कोरोनायोध्दा असणाऱयांनाच कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना नियंत्रण कक्षातील एक डॉक्टर तसेच एका पोलीस उपनिरीक्षकांसह सहा पोलीस बाधित झाले आहेत. तर महापालिका क्षेत्रात नवीन 57 रूग्ण वाढले आहेत.
सांगली-मिरजेत रूग्ण संख्या वाढतेय
सांगली – मिरज आणि कुपवाड महापालिका शहरात कोरोना वाढतच चालला आहे. गुरूवारी सांगली शहरात 38, मिरज शहरात 17 आणि कुपवाड येथे दोन असे एकूण 57 रूग्ण आढळून आले आहेत. यामध्ये सांगली शहरात रमामाता नगर येथे चार, नळभाग येथे दोन, विश्रामबाग येथे तीन बेथेलहेमनगर येथील गल्लीनंबर दोन मध्ये एक विद्यानगर नगर वारणाली येथे एक जगदाळे प्लॉट येथे एक, चांदणी चौक येथे एक आणि खणभागात एक, गावभागात पुणे येथून आलेली एक वृध्दा पॉझिटिव्ह आढळून आली आहे. तर वसंतदादा सर्वोपचार रूग्णालयातील एक व्यक्ती पॉझिटिव्ह आढळली आहे. असे एकूण सांगली शहरात 38 रूग्ण वाढले आहेत. तर मिरज शहरात 17 रूग्ण वाढले आहेत. हे वाढलेले रूग्ण कोरोना रूग्णांच्या संपर्कातील आहेत. कुपवाड येथे दोन रूग्ण वाढले आहे.
आटपाडी, कवठेमहांकाळ, मिरज आणि पलूस तालुक्यात रूग्ण वाढले
आटपाडी तालुक्यात एकूण सात रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये पाच रूग्ण हे आटपाडी येथील आहेत. त्यातील तीनजण पोलीस आहेत. तर लेंगरेवाडी येथे दोघेजण पॉझिटिव्ह आले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यात दोन रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये एक कवठेमहांकाळ शहरात आणि एक नागज येथे वाढला आहे. मिरज तालुक्यातील भोसे येथे एक रूग्ण वाढला. तर पलूस तालुक्यातील ब्रम्हनाळ येथे एक व बांबवडे येथे दोन रूग्ण आढळून आले आहेत.
कोरोना योध्दय़ांनाच कोरोनाची लागण
सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याकडे कार्यरत असणाऱया एका पोलीस उपनिरीक्षकाला कोरोनाची लागण झाली आहे. तर सांगली वाहतूक कक्षाकडे कार्यरत असणाऱया दोन पोलीसांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आटपाडी येथे कार्यरत असणाऱया एका वाहकाला कोरोना झाल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या तीन पोलीसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे एका उपनिरीक्षकांसह सहा पोलीस कोरोनाबाधित झाले आहेत. दोन दिवसापुर्वी एक महिला अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आली होती. जिल्हय़ाचा कोरोना नियंत्रण कक्ष जिल्हापरिषदेमध्ये आहे. याठिकाणी कार्यरत असणाऱया एका डॉक्टरलाही कोरोनाची लागण झाली आहे. त्याचा दररोज कोरोनाचे नोडल अधिकारी डॉ. संजय साळुंखे यांच्यासह वरीष्ठ डॉक्टर आणि इतर विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱयांशी संपर्क येत असल्याने जिल्हापरिषदेमध्ये चांगलीच खळबळ माजली आहे.
तब्बल 48 जण कोरोनामुक्त
जिल्हय़ात गुरूवारी जरी 70 रूग्ण वाढले असले तरीसुध्दा दिलासा देणारी गोष्ट म्हणजे जिल्हय़ातील उपचार सुरू असणारे 48 जण एकाच दिवशी कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना दवाखान्यातून डिस्चार्च देण्यात आला आहे. त्यांना आता होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर उपचार सुरू असणाऱया 13 जणांच्यावर मात्र अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
कोरोनाची जिल्हय़ातील स्थिती
एकूण रूग्ण 1284
बरे झालेले 682
उपचारात 560
मयत 42