महसूल खात्याचे मुख्य सचिव मंजुनाथ प्रसाद यांचा आदेश
प्रतिनिधी / बेंगळूर
कोरोना परिस्थितीमुळे राज्यातील सर्व सबरजिस्ट्रार (उपनेंदणी) कार्यालये मागील 25 दिवसांपासून बंद ठेवण्यात आली होती. सुरुवातीला 23 मे पर्यंत ती बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर हा कालावधी वाढविण्यात आला होता. आता सोमवारपासून पुन्हा उपनोंदणी कार्यालये सुरू करण्याचा आदेश देण्यात आला आहे. महसूल खात्याचे मुख्य सचिव एन. मंजुनाथ प्रसाद यांनी रविवारी रात्री यासंबंधीचे आदेशपत्रक जारी केले आहे.
राज्यात कोरोनाचा फैलाव वाढला तरी उपनोंदणी कार्यालये सुरू होती. शिवाय नोंदणी प्रक्रियेवेळी येथे बायोमेट्रीक नोंदणी, फोटो काढण्यासाठी मास्क काढावे लागत होते. याविषयी तक्रारी दाखल झाल्याने अधिकारी आणि कर्मचाऱयांनी कार्यालये सुरू ठेवण्याबाबत आक्षेप घेतला होता. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱयांशी चर्चा करून राज्यातील सर्व उपनोंदणी कार्यालये बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला होता.
आता राज्यभरात कोरोना संसर्ग काही प्रमाणात नियंत्रणात आल्यामुळे सोमवार दि. 7 जूनपासून राज्यातील उपनेंदणी कार्यालये सुरू करण्यात येत आहेत. कोरोना सुरक्षा नियमांचे पालन करून कार्यालयीन कामे करण्याची सूचना कर्मचाऱयांना देण्यात आली आहे. त्यामुळे उपनोंदणी कार्यालयांमधील कामकाज पुन्हा सुरू होणार आहे.