कार्यालयातील संगणकावर काम करणाऱया महिलेला कोरोनाची लागण
@ प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. कोरोनाने आता सरकारी कार्यालयांमध्येही प्रवेश केला आहे. गेल्या 15 दिवसांपूर्वी उपनोंदणी कार्यालयात एजंट म्हणून काम करणाऱया एकाला कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर आता या कार्यालयातील संगणकावर काम करणाऱया महिलेला कोरोनाची लागण झाल्याने पुन्हा उपनोंदणी कार्यालय सीलबंद करण्यात आले आहे. यामुळे सरकारी कार्यालयामध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे.
कोरोनामुळे विविध सरकारी कार्यालयांमध्ये निर्बंध घालण्यात आले होते. काही सरकारी कार्यालयात प्रवेशबंदही करण्यात आला होता. सरकारला सर्वात जास्त महसूल देणारे कार्यालय म्हणून उपनोंदणी कार्यालय ओळखले जाते. त्यामुळे हे कार्यालय बंद करण्यात आले होते. मध्यंतरी एजंटला कोरोनाची लागण झाल्यामुळे एकच दिवस हे कार्यालय बंद करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱयाच दिवशी पुन्हा हे कार्यालय सुरू करण्यात आले होते.
कार्यालयातील सर्व कामे ठप्प
आता संगणकावर काम करणाऱया महिला कर्मचाऱयाला कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्या संपर्कात अनेक जण आले असल्याची शक्मयता व्यक्त होत आहे. आता त्या महिलेच्या संपर्कात आलेल्यांनाही क्वारंटाईनमध्ये ठेवावे लागणार आहे. त्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली असून आणखी काहींना कोरोना झाला आहे का, हे त्यांची चाचणी केल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. उपनोंदणी कार्यालयात कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे सर्व कामे ठप्प झाली आहेत. याचबरोबर आता महसूलही थांबणार आहे.
याबाबत अधिकाऱयांशी संपर्क साधला असता कार्यालयाचे सॅनिटायझेशन करून लवकरच हे कार्यालय पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र आता येथे कोरोनाचा पुन्हा रुग्ण आढळल्यामुळे जनतेमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.