प्रतिनिधी / नागठाणे
३२ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत नागठाणे (ता.सातारा) येथील महामार्गावरील चौकाची सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून नुकतीच पाहणी करण्यात आली. मोटार वाहन निरीक्षक जे.पी.बिरादार यांनी ही पाहणी केली.
महामार्गावरील नागठाणे चौक हा अपघातप्रणव क्षेत्र असल्याने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने येथे भेट दिली होती. यावेळी येथील उपस्थित ग्रामस्थ व प्रवाश्यांशी यावेळी चर्चा करून महामार्गावर प्रवाश्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. महामार्गावर बोरगाव पोलीस ठाण्याच्या कायमस्वरूपी एक वाहतूक कर्मचारी नेमावा अशी मागणी यावेळी उपस्थितांनी केली. यावेळी जिल्हा वहातुक शाखेचे हवालदार सचिन चव्हाण, चंद्रकांत पाटिल, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी कुलदीप पाटील,सुमित बामणे,सातारा जिल्हा काळी-पिवळी जीप संघटनेचे अध्यक्ष शंकर साळुंखे,उपाध्यक्ष संतोष साळुंखे,वाहनचालक निलेश सावंत उपस्थित होते.