प्रतिनिधी / खेड
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयात ‘कोविड १९’ च्या कामासाठी व त्याबाबत संपूर्ण राज्यातून प्राप्त होणाऱ्या सर्व माहितीचे संकलन करून त्यावर कारवाई करण्यासाठी येथील सहजीवन शिक्षण संस्थेचे संचालक व उद्योजक कौस्तुभ बुटाला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सचिवांनी तसे लेखी पत्र १५ एप्रिल रोजी त्यांना दिले आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अनुभवी म्हणून ओळखले जाणारे कौस्तुभ बुटाला मुंबईतील बरेव्हमॅक्स या माहिती तंत्रज्ञान आंतरराष्ट्रीय कंपनीचे प्रमुख आहेत.
‘कोविड १९’ संदर्भात प्राप्त होणाचा केंद्र शासन व राज्य शासनाच्या सर्व सूचनाचे संकलन करणे तसेच विविध विभागाकडून प्राप्त होणाया माहितीने संकलन व विश्लेषण ते करणार आहेत. ‘कोविड १९’ चा प्रादुर्भाव जगासह आपल्या देशातही झाला आहे. महाराष्ट्रातही कोविड १९ मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत असल्याने त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य विमान, पोलीस दल, सर्व जिल्हाधिकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था अहोरात्र झटत आहेत. राज्यस्तरावर यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला असून राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिन दर्जाच्या अधिकाऱ्यांनी नेमणूक करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयात कौस्तुभ बुटाला यांची निवड झाल्याने सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.