प्रतिनिधी / केपे
केपेचे आमदार असलेले गोव्याचे उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांचे वडील राघू कवळेकर यांचे मंगळवार 14 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता निधन झाले. ते 75 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज बुधवार 15 रोजी सकाळी 11 वा. बेतूल येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्यापश्चात पत्नी, पुत्र चंद्रकांत (बाबू), बाबल, स्नुषा व चार कन्या, जावई, नातवंडे असा परिवार आहे. कोविड-19 च्या महामारीच्या पार्श्वभूमीवर सांत्वनपर भेटीस कुणी येऊ नये, अशी विनंती कवळेकर कुटुंबियांकडून करण्यात आली आहे.