प्रतिनिधी /पणजी
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आज गुरुवार 3 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता गोवा भेटीवर येत असून रात्री त्यांचा मुक्काम राजभवनवर असेल. दुसऱया दिवशी म्हणजे शुक्रवार 4 रोजी सकाळी 11 वाजता राजभवनातील नवीन दरबार हॉलचे उद्घाटन नायडू करणार आहेत. त्यासाठी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी नायडूंना खास पाचारण केले आहे. या हॉलमध्ये नवीन सरकारचा शपथविधी होणार असून उद्घाटनास मुख्यमंत्री प्रमोद सावंत, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत तसेच राज्यपालांसह इतर मान्यवर हजेरी लावणार आहेत.