वार्ताहर / राजापूर
राजापूर शहरानजीकच्या श्री गणेश क्रीडामंडळ कोंढेतड आयोजित मर्यादित षटकांच्या ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेत बाप्पा मोरया ओणी संघाला नमवत महालक्ष्मी उपळे संघाने प्रथम क्रमांकाचा कै. रवींद्र कुळी स्मृतिचषक पटकावला.
स्पर्धेत 32 संघांनी भाग घेतला होता. अंतिम सामना महालक्ष्मी उपळे विरुद्ध बाप्पा मोरया, ओणी या संघादरम्यान रंगला. उपळे संघाने 9 धावांनी हा सामना जिंकला. विजेत्या संघाला 10 हजार 21, उपविजेत्या संघाला रोख 7 हजार 21 तर तृतीय विजेत्या पडवे व चतुर्थ विजेत्या ओशिवळे संघाला आकर्षक चषक देऊन सन्मानित केले. ‘मॅन ऑफ द मॅच’ म्हणून संकेत शिवणेकर, ‘मॅन ऑफ द सिरीज’ म्हणून स्वप्नील, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून सुशांत, गोलंदाज म्हणून स्वप्नील याला तर फलंदाज म्हणून केदार कदम यांना पारितोषिक देऊन् गौरविण्यात आले.