प्रतिनिधी/ पणजी
राज्याचे उपसभापती म्हणून निवडले गेलेले सुभाष फळदेसाई यांनी शनिवारी विधानसभा प्रकल्पात जाऊन आपल्या पदाचा राजीनामा विधानसभा सचिव नम्रता उल्मन यांच्याकडे सादर केला.
सुभाष फळदेसाई यांची दि. 30 मार्च रोजी गोवा विधानसभेच्या उपसभापतीपदी 25 विरुद्ध 15 मतांनी निवड झाली होती. त्यांनी पदभार सांभाळून केवळ 10 दिवस उलटले तोच त्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली. त्यानंतर त्यांनी सकाळी विधानसभा प्रकल्पात जाऊन मंत्रिपदाचा राजीनामा विधानसभा सचिवांसमोर सादर केला. त्यानंतर ते थेट दुपारी राजभवनवर जाऊन मंत्रिपदासाठीची शपथग्रहण केली.