लिस्बन (पोर्तुगाल
युफा चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत लिव्हरपुल फुटबॉल क्लबची उपांत्य फेरीकडे वाटचाल होत आहे. मंगळवारी येथे झालेल्या या स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात लिव्हरपूलने बेनफिकाचा 3-1 अशा गोल फरकाने पराभव केला.
या सामन्यात लिव्हरपूलने खेळाच्या पूर्वार्धात दोन गोल तर उत्तरार्धात एक गोल केला. लिव्हरपूलचा तिसरा गोल लुईस डायसने नोंदविला. या सामन्यात 17 व्या मिनिटाला इब्राहिम कोनेटीने हेडरद्वारे लिव्हरपूलचे खाते उघडले. त्यानंतर सॅडिओ मॅनेने लिव्हरपूलचा दुसरा गोल नोंदविला. मध्यंतरापर्यंत लिव्हरपूलने 2-0 अशी आघाडी मिळविली होती. बेनफिकातर्फे एकमेव गोल डार्वीन नुनेझने केला.