वेंगुर्ले /प्रतिनिधी-
उभादांडा- आडारी रस्ता ग्रामीण मार्ग मध्ये पुलाचे बांधकाम या सुमारे ७५ लाखांच्या कामाचे भूमीपूजन मंगळवारी आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. उभादांडा गावातील आडारी परबवाडा सीमेवर असलेला हा पूल पूर्ण खचून गेला होता. पावसाळ्यात या पुलाला संरक्षक कठडा नसल्याने व पूल सखल असल्याने ग्रामस्थ वाहून गेल्याची घटनाही घडली होती. यामुळे दोन्ही भागातील लोकांची हा पूल नवीन होण्याबाबत सातत्याने मागणी होती. दरम्यान आमदार पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत व आमदार दिपक केसरकर यांच्या माध्यमातून नाबार्ड मधून ह्या पुलासाठी ७६ लाख निधीतून हा पूल मंजूर झाला असून याचे आमदार केसरकर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत परब, उपजिल्हाप्रमुख सुनील डुबळे, शहरप्रमुख अजित राऊळ, जिल्हा कार्यकारणी सदस्य सचिन वालावलकर, निलेश चमणकर, उभादंडा सरपंच देवेंद्र डिचोलकर, महिला संघटिका सुकन्या नरसुले, सामाजिक कार्यकर्ते कार्मिस अल्मेडा, ग्रामपंचायत सदस्य सावली आडारकर, टीना अल्मेडा, दया खर्डे, श्री पडवळ, अण्णा वराडकर, श्री तेरेखोलकर, यांच्यासहित उभादांडा परब वाडा अशे दोनी गावातील बहुसंख्य लोक उपस्थित होते. उपस्थित ग्रामस्थांन च्या वतीने संजय फर्नांडिस यांनी आमदार दीपक केसरकर यांचे शाल श्रीफळ घालून आभार मानले.