नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
दिल्ली दंगलीशी संबंधित प्रकरणातील आरोपी आणि जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचा माजी विद्यार्थी नेता उमर खालिद याच्या ट्वीटर अकाउंटवरील ब्लू टिक ट्विटरकडून काढून टाकण्यात आली आहे.
उमर खलिद याचे हे वैयक्तिक ट्विटर अकाऊंट आहे. परंतु सप्टेंबर २०२० म्हणजे गेल्या ९ महिन्यांपासून उमर खालिदच्या ट्विटर हॅण्डलवरून एकही ट्विट करण्यात आलेले नाही .ट्विटरने म्हटले आहे की, जर एखादे ट्विटर हॅण्डल सहा महिन्यांपर्यंत अजिबात सक्रिय नसेल तर त्यावरील ब्लू टिक हटवली जाईल.
मागच्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या नवीन नियमावलीनुसार ट्विटर आणि केंद्र सरकार असा वाद सुरु आहे. त्यातच उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, संघ प्रमुख मोहन भागवत यांच्यासह इतर अनेक बड्या व्यक्तींच्या ट्विटर हॅण्डलवरील ब्लू टिक काढून टाकण्यात आली होती. त्यामुळे बराच वाद निर्माण झाला होता. ट्विटरने केलेल्या या कारवाईविरोधात भारत सरकारने आक्षेप घेतला होता. त्यानंतर ट्विटरने या नेत्यांच्या अकाउंटवरील ब्लू टिक पुन्हा परत केली होतीमागच्या काही दिवसांपासून भारत सरकार आणि ट्विटर यांच्यात नवीन आयटी नियमांवरून वाद सुरू आहे. या नियमांचे पालन करण्यासाठी ट्विटरने काही काळ मागितला आहे. तर सरकारकडून पुन्हा यावर दबाव आणला जात आहे.