प्रतिनिधी /पेडणे
आपल्याला विश्वासात न घेता सुदिन ढवळीकर यांनी पेडणे मतदारसंघाची उमेदवारी राजन कोरगावकर यांना जाहीर केल्यामुळे मगो पक्षाचे मंडळ अध्यक्ष उमेश तळवणेकर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
पेडणे येथे पत्रकार परिषदेत त्यांनी आपली कैफियत मांडताना याबाबत नाराजी व्यक्त केली. सुदिन ढवळीकर हे एक भाजपचे मेंबर आणि घटक असल्याचा आरोप उमेश तळवणेकर यांनी पेडणे येथील पत्रकार परिषदेत केला.
ते म्हणाले आपण आणि मगो समितीच्या माध्यमातून मतदारसंघात 38 बूथ बांधून समित्या गठित केल्या व पक्ष मजबूत केला. असे काम यापूर्वी पेडणे मतदारसंघात कधीही झाले नव्हते. मात्र आपण बूथ समित्या बांधल्या. भाऊसाहेब यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण काम केले. मात्र सुदिन ढवळीकर यांनी भाऊसाहेब यांच्या कार्याला तिलांजली दिली. जो उमेदवार भाजप पक्षाची उमेदवारी मागता होता. त्यालाच भाजप सदस्य पदाचा राजीनामा दिला नसतानाही पक्षात घेऊन मगोची उमेदवारी दिली आहे, अशी टीकाही उमेश तळवणेकर यांनी केली.