वृत्तसंस्था/ लंडन
सध्या यजमान इंग्लंड आणि पाक यांच्यात कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिली कसोटी इंग्लंडने जिंकून आघाडी मिळविली आहे. इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स आता काही आपल्या कौंटुबिक समस्येमुळे मालिकेतील उर्वरित सामन्यात सहभागी होणार नसल्याचे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाच्या प्रवक्त्याने सांगितले.
आता या मालिकेतील दुसऱया कसोटीत स्टोक्स उपलब्ध होणार नाही. इंग्लंडचे उपकर्णधारपद स्टोक्सकडे सोपविण्यात आले होते. पाक विरूद्धच्रा दुसऱया कसोटीसाठी इंग्लंड संघात रॉबिनसनला संधी मिळण्याची शक्यता आहे. ही दुसरी कसोटी येत्या गुरूवारपासून सुरू होईल.