बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमी कुठल्या न कुठल्या कारणाने चर्चेत राहते. तिची फॅन फॉलोइंग देखील भरपूर आहे. स्वतःच्या बोल्डनेस आणि सहृदयी वर्तताने तिने बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनेत्री समाजसेवेतही सामील होत असते. उर्वशीने कोरोनासंकटादरम्यान गरजूंपर्यंत ऑक्सिजन पोहोचविण्याची जबाबदारी हाती घेतली आहे.
उर्वशीने उत्तराखंडमध्ये 24 ऑक्सिजन कंसनट्रेटर्स दिले आहे. याचबरोबर आणखीन 20 कंसनट्रेटर्स पाठविले आहेत. उर्वशीच्या फौंडेशनकडून हे सर्व ऑक्सिजन कंसनट्रेटर्स खरेदी करण्यात आले होते. तौक्ते चक्रीवादळादरम्यान उर्वशीने लोकांना फूड पॅकेट्स, मास्क आणि सॅनिटायजर पुरविला होता.
उर्वशी लवकरच एका बिगबजेट तमिळ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात ती एका आयआयटीन आणि मायक्रोबायोलॉजिस्टच्या भूमिकेत दिसून येणार आहे. याचबरोबर थिरुतू पयाले 2 च्या हिंदी रिमेकमध्येही ती नायिकेची भूमिका साकारणार आहे. ब्लॅक राडेज नावाच्या बाइलँगुअल थ्रिलरमध्येही ती काम करत आहे.