44 वर्षांनंतरही निर्धार कायम
ब्राझीलमध्ये एका बाळाने जन्म घेतल्यावर तो 24 तासही जगू शकणार नसल्याचे डॉक्टरांनी म्हटले होते. पण आता तो व्यक्ती आता 44 वर्षांचा झाला आहे. एवढेच नाही तर हा व्यक्ती स्वतःचे शिर उलटय़ा दिशेने असूनही स्वतःच्या निर्धारामुळे आज जगात लोकप्रिय झाला आहे.
या व्यक्तीचे नाव क्लॉडियो वेरा डे ऑलिवेरा आहे. ब्राझीलच्या मॉन्टे कार्लोमध्ये जन्मलेल्या या व्यक्तीचे शिर आणि पूर्ण शरीराची रचनाच अजब आहे. शिर उलटय़ा दिशेने असण्यासह पूर्ण शरीरही वाकले होते, याचमुळे डॉक्टरांना तो अधिक जगण्याची अपेक्षा नव्हती. क्लॉडियो वेरा डे ऑलिवेरा आता एक अकौंटंट असण्यासह एक प्रेरणादायी वक्ताही ठरला आहे. ऑलिवेराला अन्य मुलांप्रमाणेच वागविले, त्याला जगण्याचे पूर्ण स्वातंत्र्य होते असे त्याची आई सांगते. जन्मावेळी ऑलिवेराला श्वसनाचा त्रास होत होता. त्याला अन्नपाणी देऊ नका कारण त्याचे जीवन अधिक दिवस चाणार नसल्याचा सल्ला डॉक्टरांनी त्याच्या आईला दिला होता. पण ऑलिवेराने विपरित स्थिती असतानाही महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करत आज स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे यश मिळविले आहे. एक सर्वसामान्य माणसाप्रमाणे ऑलिवेरा सर्व कामे करतो.