प्रतिनिधी / बेळगाव
अंमली पदार्थ प्रकरणाच्या तपासात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल येथील सीईएन पोलीस स्थानकातील पोलीस के. व्ही. चरलिंगमठ यांचा सत्कार करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी त्यांचा गौरव केला आहे.
गेल्या दोन-तीन महिन्यांपासून पोलीस उपायुक्तांनी उल्लेखनीय कामगिरी करणाऱया पोलिसांचा सत्कार करून त्यांची पाठ थोपटण्याचा पायंडा सुरू केला आहे. वेगवेगळय़ा गुन्हय़ांचा यशस्वी तपास करणाऱया पोलिसांना आपल्या कार्यालयात बोलावून प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करतात.
दोन दिवसांपूर्वी सीईएन पोलीस स्थानकात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुमारे 20 लाख रुपये किमतीचे अफीम जप्त केले. तसेच फसवणूक प्रकरणी व विविध गुन्हय़ांच्या तपासात प्रामाणिक कार्य केल्याबद्दल गौरव करत असल्याचा पोलीसउपायुक्तांनी प्रमाणपत्रात उल्लेख केला आहे.