उल्हासनगर/प्रतिनिधी
उल्हासनगर मध्ये एका दिवसात 15 कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. यामध्ये मीरा हॉस्पिटल मधून आलेल्या महिलेच्या संपर्कातील दहा रुग्ण आहेत. तर चार दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटीव्ह निघालेल्या पोलिसांचे चार नातेवाईक पॉझिटीव्ह निघाले आहेत. उल्हासनगर मध्ये कोरोना रुग्णाची संख्या 33 झाली आहे. यामध्ये शांतीनगर , गोल मैदान आणि अशोक नगर भागातील रुग्ण आहेत.