ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्र राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागतर्फे दिला जाणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांना देण्यात येणार आहे, अशी घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी केली.
5 लाख रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने 2020-21 साठीच्या पुरस्कारासाठी ही निवड एकमताने केली आहे.
उषा मंगेशकर यांनी आतापर्यंत अनेक मराठी, हिंदी यांसह इतरही अनेक भाषांमध्ये शेकडो सुमधुर गाणी गायली आहेत. ‘सुबह का तारा’, ‘जय संतोषी माँ’, ‘आझाद’, ‘चित्रलेखा’, ‘खट्टा मीठा’, ‘काला पत्थर’, ‘नसीब’, ‘खुबसूरत’, ‘डिस्को डान्सर’, ‘इनकार’ अशा अनेक हिंदी चित्रपटांतील त्यांनी गायलेली गाणी प्रचंड गाजली आहेत.
हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार शासनाने आपल्याला प्रदान करण्याचे घोषित केल्याबद्दल, उषा मंगेशकर यांनी आनंद व्यक्त केला.