बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर मोठय़ा प्रमाणात दाखल
प्रतिनिधी / बेळगाव
उन्हाळय़ाची चाहूल लागल्याने गारवा देणारी कलिंगडे बाजारपेठेसह शहराबाहेरील रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणात विक्रीसाठी दाखल झालेली पहायला मिळत आहेत. शहराबाहेरील बेळगाव-वेंगुर्ला मार्ग, एपीएमसी रोड, जुना पी. बी. रोडवर कलिंगड विक्रीसाठी मोठय़ा प्रमाणात दाखल झाली आहेत. दुपारच्या वेळेत उष्णता अधिक जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांची पावले उसाचा रस, कलिंगड, शीतपेय विपेत्यांकडे वळत आहेत.
उन्हामुळे नागरिकांना दुपारच्या वेळेत उन्हाचे चटके बसू लागले आहेत. त्यामुळे विशेष करून रसाळ कलिंगडला मागणी वाढली आहे. बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर उत्तम प्रतीची रसरशीत कलिंगडे अथणी येथून मोठय़ा प्रमाणात दाखल होत आहेत. या मार्गावर ठिकठिकाणी किरकोळ विपेते कलिंगडची विक्री करताना दिसत आहेत.
विशेषतः उन्हाळय़ाला सुरुवात झाली की कलिंगडच्या मागणीत वाढ होते. मात्र सध्या थंडी कमी व उष्णतेत वाढ झाली आहे. त्यामुळे फेबुवारीच्या प्रारंभीच कलिंगडची आवक वाढलेली पहायला मिळत आहे. आकारमानानुसार 20 रुपयांपासून 60 रुपयांपर्यंत अलिंगडची विक्री होत आहे.