वार्ताहर / उसगांव
उसगांव पंचायत क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 11 मध्ये मोन्सूनपूर्व साफसफाईच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या प्रभागाचे पंचसदस्य तुळशीदास प्रभू यांनी याविषयी बोलताना सांगितले की, कोरोनाच्या संसर्गामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पण येणाऱया संकटानाही तोंड द्यायला हवे. त्यासाठी उसगांव भागात वास्तव्यास असलेल्या मजुरांना घेऊन व सामाजिक अंतर राखून मोन्सूनपूर्व साफसफाईचे काम हाती घेण्यात आले आहे.
गावकरवाडा भागातील मुख्य रस्त्याच्या बाजूच्या गटाराची साफसफाई सुरु आहे. या प्रभागातील इतर कामेही पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.