कळंब तालुक्यातील दोन तर भूम तालुक्यातील एकाचा समावेश
प्रतिनिधी/उस्मानाबाद
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आज एकुण 78 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी 11 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले असून त्यापैकी 2 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले. ते दोघेही मुंबई येथून प्रवास करून आलेले व्यक्ती असून 1 व्यक्ती माळी नगरचा रहिवासी असून तो ठाणे येथून प्रवास करून थेट विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दाखल झाला आहे. व एक व्यक्ती चाकूर तालुक्यातील वडवळ येथील आहे. बाकी 09 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.
उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एकुण 9 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी 6 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 3 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जळकोट येथील एका व्यक्तींचे स्वॅब तपाणीसाठी आला होता त्या व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बीड येथील 29 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्या 22 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असून 7 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
उस्मानाबाद येथील 28 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी 25 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 3 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत असे एकुण 78 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी 62 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 16 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर व विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता, डॉ. गिरीष ठाकुर यांनी दिली.